तैवान सामुद्रधुनीवर वर्चस्व निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा लाभ घेऊन सीमेवरील सध्याच्या स्थितीत बदल करणे किंवा वेगवेगळ्या स्तरावर चीनशी लढा देणे, या शक्यतांवर भारताच्या लष्करी नियोजनकारांनी विचार करायला हवा.
अमेरिकेच्या प्रतिनिधी नॅन्सी पेलोसी यांनी २०२२ मध्ये तैपेईला भेट दिल्यानंतर समुद्रातील सीमा ओलांडण्यासह पीपल्स लिबरेशन आर्मीचा तैवानजवळ सातत्याने होणारा लष्करी सराव व घुसखोरी या गोष्टींमुळे तैवान सामुद्रधुनीमधील धोका वाढला आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन सन २०२७ पूर्वी चीन तैवानवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करील आणि ते करण्यासाठी चीन आपल्या लष्करी क्षमताही विकसित करीत आहे, या मुद्द्यावर अमेरिकेचे धोरणकर्ते आणि विचारवंतांच्या गटांचे एकमत झाले आहे.
बळाचा वापर करून एकत्र येण्यासाठी दि सायन्स ऑफ मिलिटरी स्ट्रॅटेजी, सायन्स ऑफ जॉइंट ऑपरेशन्स, सायन्स ऑफ कॅम्पेन्स, सायन्स ऑफ सेकंड आर्टिलीअरी कॅम्पेन्स आणि लेक्चर्स ऑन जॉइंट कॅम्पेन व जॉइंट ऑपरेशन्स हेडक्वार्टर्स वर्क अशा चीनच्या अधिकारी संस्थांकडून स्वतंत्र किंवा संयुक्त मोहिमा आखल्या जाऊ शकतात. त्यामध्ये जॉइंट फायरपावर स्ट्राइक कॅम्पेन (जेएफएससी), दि जॉइंट ब्लॉकेड कॅम्पेन (जेबीसी) आणि जॉइंट आयलंड लँडिंग कॅम्पेन (जेआयएलसी) यांचा अंतर्भाव असू शकतो. जॉइंट फायरपावर स्ट्राइक कॅम्पेन हे भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीची मोहीम आहे. त्या मोहिमेत शत्रूच्या नेतृत्वाला आणि लोकांना घाबरवण्यासाठी लांब पल्ल्याची आक्रमणे करण्याचा समावेश होतो. दि जॉइंट ब्लॉकेड कॅम्पेन ही शत्रूला आर्थिकरीत्या मेटाकुटीला आणण्यासाठी आणि शरण आणण्यासाठी आखण्यात येणारी एक प्रदीर्घ मोहीम आहे, तर जॉइंट आयलंड लँडिंग कॅम्पेन ही लष्करी मोहिमांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठीची मोठ्या प्रमाणातील संयुक्त आक्रमक मोहीम आहे.
Yorumlar